Home अवर्गीकृत लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगीरी…

लता मंगेशकर हॉस्पीटलच्या डॉक्टरांची कौतुकास्पद कामगीरी…

71
0
SHARE

नागपूर : – २ फेब्रुवारी २०२० ला सकाळी १० वाजता घडलेली मध्य भारतातील ही कदाचित पहिलीच ही घटना मानता येईल. श्रीमती दीक्षा बोंडे,वय ४७ वर्षे या चिखला (मॉईल ) येथील रहिवासी    असून त्या मुलीच्या लग्नाकरिता घराची साप – सफाई करीत होत्या . घरातील जुने कपडे व कचरा जाळण्यासाठी त्यांनी अंगणात आणला.त्यात जुने ट्युबलाईटस पण होते. कपडे जाळण्यासाठी आग लावताच तिथे मोठा स्फोट घडून आला व प्रंचड मोठा आवाज झाला.
स्फोट इतका भयानक होता की बॉम्ब फुटल्या सारखा आवाज झाला तुबलाईट्सचा स्फोट झाल्यामुळे काचेचे बारीक तुकडे श्रीमती  दीक्षा बोंडे यांच्या शरीरात खोलवर घुसले. तीव्र वेदनेमुळे व अंगाची आग होत असल्यामुळे त्यानां  खुपत्रास  व्हायला लागला त्या मुळे त्या खूप   आरडा -ओरडा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांना लगेच लता मंगेशकर हॉस्पीटल सीताबर्डी नागपूर येथे दुपारी 2 ला उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे यांनी रुग्णाला ताबडतोब कॅज्युअल्टीमध्य बघितले असता रुग्णाची अवस्था खूपच खालावलेली दिसली.त्यांना स्वास घेता येत नव्हता ब्लडप्रेशर कमी होऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या डॉ. चोपडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला आयसीयूमध्य हलविले व ताबोडतोब उपचार सुरु केले .उपचारादरम्यान त्या वारंवार बेशुद्धीअवस्थेत जात होत्या .अथक प्रयत्नानंतर रुग्णाला शुद्धी आली ….
त्यानंतर शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या शरीरातून १६८ जागी असलेले काचेचे तुकडे डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढले .अशाप्रकारे लता मंगेशकर हॉस्पीटलमधील सर्जरी विभागातील वैद्यकीय चमूने अथक प्रयत्न करून रुग्णांना नवीन जीवन दान दिले शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र चोपडे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्ष देशमुख .डॉ. अफजल शेख, नेत्ररोग तज्ञ डॉ .सोनाली खन्ना, बधिरीकरण तज्ञ डॉ. प्राजक्ता बीजवे यांनी ही मोलाची कामगिरी  पार पाडली आहेत..रिपोर्टर गणेश  लांजेकर

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here