Home अवर्गीकृत शहीद जवान संभाजी कदम यांच्या मुलीच्या शिक्षणा संदर्भात न्याय देण्यासाठी राज्यमंत्री...

शहीद जवान संभाजी कदम यांच्या मुलीच्या शिक्षणा संदर्भात न्याय देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पुढाकार …

113
0
SHARE

नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान संभाजी कदम यांच्या वीरपत्नीला आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी वणवण फिरावं लागत असल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ रोजी ते शहीद झाले होते. संभाजी कदम यांच्या अत्यंविधीवेळी याच जिल्ह्यातील नव्हे तर आजुबाजुच्या जिल्ह्यातील हजारो लोक दर्शनासाठी आले होते. संभाजी कदम यांना तेजस्विनी नावाची मुलगी आहे तिचं वय ६-७ वर्ष आहे. वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगलं शिक्षण देऊन मोठं अधिकारी बनविण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी चांगल्या शाळेत तिला प्रवेश मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.मात्र, लेकीला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं ती मोठी अधिकारी बनावी असं स्वप्न बाळगणाऱ्या शहीद जवानाच्या वीरपत्नीला अनेक शाळांचे उंबरठे झिजवूनही निराशा पदरी पडली आहे. त्यामुळे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी खंत शहीद जवान संभाजी कदम यांच्या वीरपत्नी शीतल कदम यांनी व्यक्त केली आहे.( पत्रकार- गणेश लांजेकर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here