अमरावती: परतवाड्यातील खुनाची शाई वाळण्यापूर्वीच अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या खून झाला. सातुर्णा परिसरात खंडेलवाल नगर येथे राहणाऱ्या ४० वर्षीय मदन झिंगरी यादव याचा धारधार शास्त्रांनी खून करण्यात आला. या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे. मृतक यादवच्या डोक्यावर खांद्यावर शास्त्राचे घाव आहेत. यावरून कुऱ्हाडीने किंवा तलवारीने यादववर हल्ला केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, सल्ली उर्फ विक्की ठाकूरच नाव समोर आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलय. दोघेही दारू प्यायले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. त्यावरून दारूवरून वाद झाला असावा. त्यांच्या बरोबर आणखीही काही लोक होते. त्यांचीही माहिती पोलीस घेताहत. घटनास्थळानजीक दारूचे दुकान आहे येथे मृतक व अन्य आले होते का हे बघण्याकरिता या दुकानाचेही सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासताहेत. दिवसाढवळ्या हा खून झालाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंदोबस्त लागला असताना दारू जुगाराच्या वादातून खून पडताहेत. या घटनेने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागताहेत.
राजेश कुमार (प्रतिनिधी)