Home शहर समाचार नागपुर अपंगांना शासनाद्वारे त्रास बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू…….. मुन्ना महाजन

अपंगांना शासनाद्वारे त्रास बंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू…….. मुन्ना महाजन

13
0
SHARE

अपंगाना बॅटरी ट्रायसिकल शासनाद्वारे नियमानुसार देण्याकरिता होणारा, त्रास बंद करण्याबाबत.
नागपूर : दिं.१९ ऑगष्ट, २०१९ स्वाभिमान पार्टीच्या वतीने आज राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना महाजन भगवानदास राठी यांच्यासहित महापालिका नागपूर, समाज कल्याण विभागातर्फे अपंगाना देण्यात येणाऱ्या बॅटरी चलित ट्रायसिकलचा वाटपामध्ये लाभार्थीना (अपंगाना ) नियमाच्या नावाखाली होणाऱ्या त्रासामुळे अनेक अपंग त्याचा फायदा घेवु शकत नाही. त्याकरीता वरील शासकीय नियम थांबवून अपंगाना कोणताही त्रास होवु नये म्हणुन खालील नियम शिथिल करण्यात यावे.
१) उत्पन्नाचा दाखला आणणे.
२) स्वत:च्या पैशाने नगदी ट्रायसिकल खरेदी करून ते खरेदी, बील व ट्रायसिकलवा फोटो शासनास सादर करणे हि अट असल्यामुळे हयांना अतिशय त्रास होतो आहे. हया सर्व अटी त्वरीत रद्द करून त्यांना सहज ट्रायसिकल देण्यात यावी हि विनंती. वरील मागणी ८ दिवसात पुर्ण न झाल्यास आम्ही तिव्र आंदोलन करू. आंदोलनाची सर्व जबाबदारी शासनाची राहील. यावेळी पत्रपरिषदेला राष्ट्रीय संघटन मंत्री मुन्नाजी महाजन, भगवानदास राठी प्रदेश कोषाध्यक्ष, नागपूर शहर अध्यक्ष श्रीधर गरूड , विदर्भ अध्यक्ष निखील भुते, शैलेंद्र खडसे, पंकज बान्ते, आशिष हुकरे, प्रकाश पानतावणे परिषदेत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here