नागपुर: एकीकडे निसर्गाचा कोप तर दुसरी कड़े महानगरपलिका व OCW चा भोंगळ कारभार या मुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाई मुळे संपूर्ण जनता त्राही त्राही झालेली आहे.
नागपूर शहराच्या इतिहासात आजपर्यत अशी पाणी टंचाई यापूर्वी कधीही झाली नव्हती. या मधे सर्वस्वी महापालिका व OCW चे ढिसाळ कार्यप्रणाली जिम्मेदार आहे.
मुख्यमंत्री यांचे शहर म्हणून नावाजलेले आज कृत्रिम पाणी टंचाई मुळे समस्त राज्यात नागपूर शहर प्रसिद्ध होत आहे.
ढिसाळ प्रशासणामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई च्या विरोधात मध्य नागपुरातील प्रभाग क्र१८ भुतेश्वर नगर येथील नागरिकांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके व शहर युवक काँग्रेसचे महासचिव रोशन पंचबुद्धे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री यांना एक ग्लास पाणी उपहार देऊन प्रतिकात्मक निषेध प्रकट करण्यात आला. या निषेध कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.
या वेळी नगरसेवक बंटी शेळके यांनी OCW प्रशासनावर चांगलाच वचपा काढला. शेळके यांनी सांगितले की आज शहरातील अनेक परिसरातील पाण्याचा लाईन फुटलेल्या स्थितीत आहे. त्या मुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नॉन कनेक्टिग वस्त्यांमध्ये पाणी पुरविण्यात येनारे टँकर सुद्धा लिकेज स्वरूपात आहे या मुळे सुद्धा किती तरी लिटर पाण्याची नासाडी होत आहे. म्हणून नागपूर शहरातील पाणी टंचाई ही अधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली कृत्रिम पाणी टंचाई आहे. जर लवकरच ही कृत्रिम पाणी टंचाई दूर झाली नाही तर जनतेणे आज गांधींच्या मार्गाने आंदोलन केले आहे, पण यापुढे आक्रमक मार्गाने प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
या वेळी प्रामुख्याने मालू बलकी, अर्चना कावळे, शकुंतला पिसे, सुमन पंचबुद्धे, छगुणबाई राऊत,जैनांबाई पातरकर,शांताबाई खोडके,छबुबाई करवतकर,माधुरी ठवकर,कौशल्या दुरुगवार,गीताबाई राऊत,जोत्सणा नेरकर,कमल कायरकर,प्रमिला कुंभारे,रजनी रंधारे,शांताबाई भोयर,गीता कढवं,अश्विनी मातोरे,सुनीता चांदपूरकर,स्नेहल पंचबुद्धे,प्रभा कढवं,मीना कुमारे,सुशीला कढवं,कलावती चंध्ये,संध्या पंचबुद्धे व मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते .