Home विदर्भ यवतमाल महाराष्ट्र राज्यातील मटका किंग सट्टा, अवैधधंदा बंद करा -> अब्दुल अन्सारी अब्दुल...

महाराष्ट्र राज्यातील मटका किंग सट्टा, अवैधधंदा बंद करा -> अब्दुल अन्सारी अब्दुल रहूफ, यवतमाल.

843
0
SHARE

नागपूर / प्रतिनिधी, दि. 22 जुलै

अब्दुल अन्‍सार अब्दुल रहूफ, हल्ली मुक्काम कळंब चौक, यवतमाळ रहिवासी असून महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ता पत्रपरिषदेच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे याचे मुख्य कारण संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील शहर, गांव व खेड्यातील, चौका, चौकात सुरु असलेले अवैध वरली मटका धंदेकाउंटर आहे. सदर वरली मटका काउंटरवर सामान्य माणसा सोबत दारुडे , गुंड , मवाली, टपोरी ई. मटका व वरली लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोळा होतात. वरली मटका हा व्यवसाय पुर्णतः बेकायदेशिर असुन कायद्याप्रमाणे एका ठिकाणी ४, पाच च्यावर व्यक्ती एकत्र गोळा होऊ शकत नाही. आप आपसात भांडण तंटे व मारामाऱ्या होऊन शांतता भंग होते आणि त्याचा सर्वसामान्य शांतता प्रिय नागरीकांना नेहमी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. श्रीदेवी नाईट सुप्रिम नाईट , मिलन नाईट , सुपर बाँबे, मेन बजार, मेन कुबेर राजधानी नाईट अश्या विविध प्रकारच्या नांवाने हा अवैध वरली मटका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालु आहे. यापुर्वी हे या वरली मटक्याचे आकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथुन जाहिर होत होते. सर्व गैरअर्जदार मटका किंग आप आपल्या जिल्हयात स्वत:च मना नुसार आकड़े काडून जाहीर करतात आणि लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक करतात. आणि या अवैध धंध्यातुन त्यांनी मोठया प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केलेली आहे. गैरअर्जदार हया अवैध धंध्याचे प्रमुख आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील शहर, गांव व खेड्यातील चौका, चौकात अवैध वरली मटका काउंटर पोलिसांच्या आशिर्वादाने सर्रास सुरू आहे. पोलिसांना माहिती असतानाही त्यांनी या अवैध धंध्याचे मुख्य सूत्रधार असलेले गैरअर्जदार यांच्यावर आजपर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही. पोलिसांनी दाखविण्यासाठी या धंध्यात असलेल्या फक्त छोट्या अवैध वरली मटका काउंटर चालवणान्यांवर कार्यवाही केलेली आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या जनतेच्या शोषण होणाऱ्याा धंध्याला मोठी वाट मोकळी करुन दिली आहे. या अवैध वरली मटक्याच्या धंध्यातून सर्वसामान्य जनतेचे शोषण करुन मोठी बेकायदेशिर संपत्ती जमा केलेली आहे. त्यांनी जमा केलेल्या सर्व अवैध संपत्तीच्या स्त्रोतांची त्वरीत चौकशी करावी व जप्त करण्यात यावी. आणि त्यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करुन हे अवैध धंदे त्वरीत बंद करण्यात यावे. या वरली मटका च्या धंध्यामुळे सर्व सामान्य जनतेला त्यांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणातून मुक्त करावे असे पत्रपरिषद यवतमाळचे रहिवसी अन्सार अब्दुल रहूफ यांंनी सांगितलेे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here