Home शहर समाचार नागपुर रेडीसन ब्लु हॉटेलला १ लाखांचा दंड, निकृष्ठ पनीर

रेडीसन ब्लु हॉटेलला १ लाखांचा दंड, निकृष्ठ पनीर

407
0
SHARE

नागपूर : निकृष्ठ पनीर प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरच्या सोमलवाडा येथील रेडीसन ब्लु हॉटेलवर १ लाखांचा दंड ठोठावला.

रेडीसन ब्लु हॉटेल मधून पनीर या अन्न पदार्थाचा नमुना अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे यांनी १५ डिसेंबर रोजी विश्लेषणातच घेतला होता, सदर पनीर चा नमुना अन्न विश्लेषक, प्रादेशिक प्रयोगशाळा, नागपूर येथे विलेषणकरीता पाठविला असता, पनीर हा अन्न पदार्थ कमी दर्जाचा यांनी घोषित केला होता. त्यानंतर सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे यांनी चौकशी प्रकरणी हॉटेलच विकास पाल यांचेविरुध्द न्यायनिर्णय अधिकारी शशिकांत केकरे यांनी दंड ठोठावला.

न्यायनिर्णय प्रकरणांत सुनावणी दरम्यान प्रशासनातर्फे अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी, नागपूर यांनी बाजु मांडली, गैरअर्जदार यांनी कमी दर्जाचे अन्न पदार्थ उत्पादित करुन विक्री केली असल्याचे मान्य केले असुन त्यांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here