Home शहर समाचार नागपुर वृक्षारोपन संपन्न,

वृक्षारोपन संपन्न,

209
0
SHARE

नागपूर : आॅल इंडिया सोनार फेडरेशनच्या माहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सौ.अनिताताई दारव्हेकर यांच्या वाढदिवसा निमित्य २५ जून रोजी, इंदिरा मातानगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डिगडोह (देवी) येथील सरपंच सौ. ईंद्रायणि सुरेश काळबांडे व सुरेश काळबांडे यांच्या हस्ते अनिता दारव्हेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पंचवीस ( २५ ) झाडे लावण्यात आले. निता पोद्दार यांनी सुत्र संचालन केले. समाजसेविका अनिता ताईंना वृक्षां बद्धल असलेली तळमळ निताताईनी आपल्या संचलनातूनन बोलून दाखविले. नुकताच अनिता ताईना अहमदनगर येथे जय मल्हार संस्थेतर्फे अहिल्याबाई होळकर जिवन गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आला. अनिताताई म्हणतात या पुरस्काराचे खरे मानकरी माझे मार्गदर्शक आं.इं.सो.फे. चे अध्यक्ष मा.मोहन शेट हिवरकर व डाॅ. देवेद्र शेरेकर आं.इं.सो.फे.चे महा सचिव हे आहेत. वृक्षारोपणा करिता सौ. सोनाली कडु वार्ड क्र. 37 च्या नगरसेविका यांनी झाडे उपलब्द करुन दिले. यावेळी संजय पंचदाणे. विजय थुंगावकर मुकुंदराव शाहाणे. गजानन चकोले. काशिनाथ मापारी. चेतनलाल पांडे. ज्ञानेश्वर कोकुर्डे. विजय सराट. विष्णुपंत बानाईत. स्वप्निल बंड, बबनराव ठाकरे. शैलेश राय. सुरेश राजवाडे, बाळुभाऊ दोडे, गजानन भोयर, निता बैतुले, मंजुषा कांबळे , आम्रपाली इंगळे सौ. रडकेताई. आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here