Home अवर्गीकृत वरोरा नगर परिषद येथे विषय समितीचे सभापती या पदाकरीत नुकतीच निवडणूक पारपडली..

वरोरा नगर परिषद येथे विषय समितीचे सभापती या पदाकरीत नुकतीच निवडणूक पारपडली..

47
0
SHARE

६ जानेवारी २०२० रोजी  सोमवारला  वरोरा नगर परिषद येथील नुकतीच निवडणूक  पारपडली आहेत इथे  विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून   उपविभागीय अधिकारी वरोरा श्री .सुभाष शिंदे व मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा श्री. सुनील बल्लाळ  यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक  घेण्यात आली विषय समितीचे सभापती या पदाकरीता  ही निवडणूक घेतली गेली आहे .

वरोरा:- नगर परिषद वरोरा येथे विविध विषय समितीकरिता सदस्य नामनिर्देशपत्र स्वीकारने तसेच समिती सभापती या पदाची  निवडणूक घेण्याकरीत दिनांक ६/१/२०२० रोज सोमवारला  न.प.वरोरा येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेकरिता पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा श्री. सुभाष शिंदे  यांची नियुक्ती करण्यात आली होती व यांना मुख्याधिकारी श्री. सुनील बल्लाळ यांनी सहकार्य केले होते.विशेष सभेमध्ये भा.ज.पा प्रणित वरोरा विकास आघाडी गटातर्फे गटनेते श्री. अहेतेशाम अली अध्यक्ष यांनी विषय समिती सदस्याकरीत यादी सादर केली. तर शिवसेना तर्फे गटनेते श्री.गजानन मेश्राम यांनी यादी सादर केली. मध्येंतरीच्या काळात  भा.ज.पा   प्रणित वरोरा विकास आघाडीतर्फे बांधकाम सभापतीकरीता  श्री.शेख जैरुद्दीन मोहिद्दीन, आरोग्य सभापतीकरीता श्री. ऑड प्रदीप बुरण,पाणी पुरवठा सभापतीकरीत श्री.अक्षय भिवदरे ,नियोजन समिती सभापतीकरीता सौ. सरला तेला, महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीकरीता सौ. रेखा समर्थ तर उपसभापतीकरीता सौ. ममता  मरसकोल्हे यांचे नामांकन दाखल करण्या आले होते . 

प्रत्येक समितीकरीता एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे  बांधकाम सभापती म्हणून  श्री. शेख जैरुद्दीन मोहिद्दीन ,आरोग्य सभापती म्हणून ऑड.प्रदीप बापुराव बुराण ,पाणी पुरवठा सभापती म्हणून श्री. अक्षय दिलीपराव भिवदरे ,नियोजन समिती सभापती म्हणून सौ. सरला शामसुंदर तेला ,महिला व बाल कल्याण समिती सभापती म्हणून सौ. रेखा सुनिल समर्थ व उपसभापती माणून सौ.ममता परसराम बरसकोल्हे,यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. शिक्षण समिती सभापती पदावर (न.प.वरोरा उपाध्यक्ष) अनिलभाऊ झोटिंग यांची पदसिद्ध सभापती म्हणून निवड करण्यात आली. उपरोक्त सर्वांची सभापतीपदी अविरोध निवड झाली तसेच स्थायी समिती सदस्य म्हणून श्री. अनिल साकरीया ,श्री. दिलीप घोरपडे ,श्री. गजानन मेश्राम यांची अविरोध निवड झाली त्यावेळी  मा.अहेतेशाम अली न.प.वरोरा अध्यक्ष इतर सर्व सदस्य हजर होते.

  स्थायी समिती सदस्य पदाकरीता भा. ज.पा आघाडीतर्फे श्री. अनिल साकरीया व श्री. दिलीप घोरपडे       व शिवसेना गटातर्फे  श्री. गजाननराव मेश्राम  यांचे नामनिर्देशनात आणण्यात आले. तसेच सभेमध्ये  श्री. अहेतेश्याम अली (न.प.अध्यक्ष वरोरा),श्री. अनिलभाऊ झोटिंग (उपाध्यक्ष न.प.वरोरा) ,श्री. गजाननराव मेश्राम , श्री. सन्नि गुप्ता,श्री.दिनेश यादव ,श्री. शेख जैरुद्दीन मोहिद्दीन,श्री. अक्षय भिवदरे, सौ. सुनिता काकडे ,सौ.मनीषा मेश्राम, सौ.ममता मरसकोल्हे,सौ.रेखा समर्थ सौ.राशी चैधरी, श्रीमती. मंगला पिंपळकर,कु.राखी गिरडकर ,सौ.प्रणाली मेश्राम, डॉ. गुणानंद दुर्गे ,सौ.दीपाली टिपले ,श्री. दिलीप घोरपडे, श्री. ऑड.प्रदीप बुरण,सौ. सरला तेला, श्री. पंकज नाशिककर, श्री. सुभाष भागडे , श्री. राजेश महाजन,सौ.सुषमा भोयर,सौ. चंद्रकला चिमुरकर इत्यादी सदस्य उपस्थित होते.प्रतिनिधी गणेश प्रभाकर  लांजेकर (वरोरा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here