Home अवर्गीकृत ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

ठाकरे सरकारचे पालकमंत्री जाहीर, कोणत्या पक्षाला किती पालकमंत्रिपदं?

49
0
SHARE

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच जिल्हानिहाय पालकमंत्रिपद जाहीर केले. खातेवाटपानंतर सर्वांचे लक्ष जिल्हानिहाय पालकमंत्री कोण होणार याकडे लागले होते. आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर केली.या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे.यात मुंबई शहराच्या पालकमंत्रिपदी काँग्रेस नेते आणि वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची वर्णी लागली आहे. तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रिपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे.राष्ट्रवादी (12)1.पुणे- अजित अनंतराव पवार 2.रायगड – आदिती सुनिल तटकरे 3.नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ 4.अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील6. सांगली- जयंत राजाराम पाटील7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील8. जालना- राजेश अंकुशराव टोपे9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुखशिवसेना (13)1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे3. रत्नागिरी-  अनिल दत्तात्रय परब4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत5. पालघर- दादाजी दगडू भुसे6. धुळे- अब्दुल नबी सत्तार7. जळगाव-  गुलाबराव रघुनाथ पाटील8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड11. गडचिरोली-  एकनाथ संभाजी शिंदे12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडूकाँग्रेस (11)1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण6. लातूर- अमित विलासराव देशमुख7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील11. चंद्रपूर-  विजय नामदेवराव वडेट्टीवार प्रतिनिधी गणेश लांजेकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here