Home अवर्गीकृत ओबीसी चा फक्त मत पेटी करिता वापर वडेट्टीवार यांचे ओबीसी प्रेम आटले...

ओबीसी चा फक्त मत पेटी करिता वापर वडेट्टीवार यांचे ओबीसी प्रेम आटले …!

32
0
SHARE
महाआघाडीच्या नव्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्रालय मिळालेल्या विजय वडेट्टीवार यांनी  दुय्यम दर्जाचे मंत्रालय दिले असा आरोप करीत नाराजी पत्कारली. ओबीसी सारख्या  सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या  खात्याला दुय्यम मानून वडेट्टीवार हे ओबीसीचा अपमान करीत आहेत 
विजय वडेट्टीवार हे स्वतः ओबीसी असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे काँग्रेस सत्तेच्या बाजूला असताना विजय वडेट्टीवार सातत्याने ओबीसी समाजाचे मुद्दे उचलत असायचे परंतु आता महाविकास आघाडी च्या सरकारने विजय वडेट्टीवार याना ओबीसी खाते  दिले असून विजय वडेट्टीवार यांनी पदभार न  स्वीकारणे म्हणजे हा ओबीसी समाजाचा अपमान असून ओबीसी चा मत पेटी करिता वापर होत असल्याचा संभ्रम जनते मध्ये निर्माण होत आहे.महाआघाडीच्या नव्या मंत्रिमंडळात ओबीसी मंत्रालय मिळालेल्या विजय वडेट्टीवार यांनी  दुय्यम दर्जाचे मंत्रालय दिले असा आरोप करीत नाराजी पत्कारली. ओबीसी सारख्या  सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या  खात्याला दुय्यम मानून वडेट्टीवार हे ओबीसीचा अपमान करीत आहेत अशी भावना अनेक ओबीसी नेत्यांनी टीम खबरकट्टा सोबत विषयावर चर्चा करताना व्यक्त केली आहे.मागील अनेक दशकांपासून ओबीसीवर सातत्याने अन्याय होत आहे. “या समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप खुद्द विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला होता”. विधानसभेतील हे भाषण निवडणुकीत सोशल मीडियावर फिरवून  आपण ओबीसी चे कसे तारणहार आहोत हे दाखवून ओबीसीची मते मिळविली.  आता ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसीचा विकास करण्याची संधी चालून आली असताना मात्र, हे खाते त्यांना अपमानास्पद वाटत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ओबीसी मंत्रालयाचे माध्यमातून ओबीसीसाठी विविध योजना तयार करून त्या राबवून विकास करण्याची संधी सोडून सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या  खात्याला दुय्यम समजून मंत्रीपदाचा पदभारही स्विकारला नाही.वडेट्टीवार यांचे ओबीसी प्रेम आटले असून त्यांचा ओबीसी समाजाप्रती असलेला ढोंगीपणा जनतेच्या ध्यानात आला आहे. स्वतः च्या स्वार्थापोटी  खात्याचा पदभार न स्वीकारणे हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे.या मंत्रालयाला दुय्यम दर्जाचे मानने हा समस्त ओबीसी समाजाचा अपमान असल्याची भावना या समाजात पसरत आहे.बावनकुडेचे ही तेच : ओबीसी मंत्रालय वरून नाराज असलेल्या विजय वडेट्टीवार यांना भाजपाकडे ओढण्यासाठी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय वडेट्टीवार यांना दुय्यम दर्जाचे मंत्रालय दिल्याबद्दल आघाडी सरकारवर टीका केली. स्वतः ओबीसी समाजाचे असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ओबीसी मंत्रालयाला दुय्यम दर्जा दिल्याने त्यांचे वक्तयाबद्दलही ओबीसी समाजामध्ये संतापजनक  प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रतिनिधी गणेश प्रभाकर  लांजेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here