नागपूर /प्रतिनिधी, दि. 23 जुलै.
भारतीय असंतोषाचे जनक आणि थोर पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या टिळक पत्रकार भवनात, आज सकाळी त्यांना अभिवादन करण्यात आले. टिळक पत्रकार भवन ट्रस्ट चे उपाध्यक्ष विनोद देशमुख, श्यामकांत पात्रीकर, अरुण दिवाण, देवराव प्रधान तसेच आदींनी याप्रसंगी टिळकांच्या अर्धपुतळ्याला, तसेच प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.